नुकतेच जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारत आणि जपानमधील द्विपक्षीय नौदल सराव JAIMEX २०२६ मध्ये भारतीय नौदल जहाज INS सह्याद्रीने आपला सहभाग नोंदविला आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर द्विपक्षीय नौदल सराव असून सागरी आंतरकार्यक्षमता तसेच परिचालन सहकार्य वाढवण्यासाठी जपानमधील होंशूच्या दक्षिणेकडील समुद्रात आयोजित करण्यात आला होता.
  • हा सराव १३-१४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान संपन्न झाला आहे.
  • यामध्ये भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे शिवालिक-श्रेणीचे मार्गदर्शित-क्षेपणास्त्र स्टेल्थ फ्रिगेट - INS सह्याद्री तर जपान सागरी स्व-संरक्षण दलाचे इसे, ह्युगा-श्रेणीचे हेलिकॉप्टर विनाशक शिप सहभागी झाले होते.
  • सदर कवायतीमध्ये समन्वित सामरिक सागरी डावपेच तसेच प्रगत सागरी दळणवळण कवायती यांचा समावेश करण्यात आला होता.