नुकतीच राहुल जैन यांची IMF मधील भारताच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते मध्य प्रदेश केडरचे २००५ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत.
  • सध्या ते कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

 IMF बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)
  • स्थापना वर्ष: १९४४ मध्ये ब्रिटन वूड्स परिषदेत निर्णय झाल्यानंतर २७ डिसेंबर १९४५ रोजी IMF ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण:  वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका येथे IMF चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: १९१ देश सध्या IMF चे सदस्य आहेत.
  • कार्यरत व्यवस्थापकीय संचालक: क्रिस्टालिना जॉर्जिव्हा या सध्या IMF च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.