नुकतेच IIT हैदराबाद आणि क्रिमसन एनर्जीमार्फत (Crimson Energy) भारताच्या ‘अनुज्ञान’ (ANUGYAN) या पहिल्या अणु-विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- नुकताच भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT), हैदराबाद, तेलंगणा यांनी 'क्रिमसन एनर्जी एक्सपर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' (Crimson Energy Experts India Private Limited - CEEPL) च्या सहयोगाने 'अनुज्ञान (ANUGYAN)' – अणुतंत्रज्ञान अभिमुखता कार्यक्रम (Nuclear Technology Orientation Program - NTOP) सुरू केला.
- अणु-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत-उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील हा पहिलाच संयुक्त कार्यक्रम आहे.
'अनुज्ञान' (ANUGYAN) अणु-प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती:
- हा जवळपास ३ महिन्यांचा निवासी स्वरूपाचा कार्यक्रम आहे.
- भारताची अणुऊर्जा क्षमता सध्याच्या सुमारे ८.८ गिगावॅटवरून २०४७ पर्यंत १०० गिगावॅटपर्यंत वाढवण्याच्या उद्दिष्टाला बळ देणे, कुशल अणु-तंत्रज्ञान व्यावसायिक तयार करणे आणि त्याद्वारे मनुष्यबळाची कमतरता भरून काढणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.