नुकतीच उत्तर प्रदेशातील नोएडास्थित खाजगी संरक्षण कंपनी IG Defence मार्फत राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजवर भारताच्या पहिल्या स्वायत्त 'काउंटर-ड्रोन मायक्रो-मिसाईल (Counter-Drone Micro-Missile)' असणाऱ्या 'ज्वाला MK-1 (JWALA MK-1)' ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • हे भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले स्वायत्त 'काउंटर-अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टम (Counter-Unmanned Aircraft System - CUAS)' मायक्रो-मिसाईल प्रणाली आहे.
  • 'ज्वाला MK-1' ची कार्यात्मक श्रेणी ५ किलोमीटर पर्यंत असून, ती ५० मीटर ते ५,००० मीटर उंचीपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे.