नुकतीच 'इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (Indian Farmers Fertilizer Cooperative Limited. - IFFCO)' चे अध्यक्ष दिलीप संघानी यांची २०२६-२०३० या कालावधीसाठी 'इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स (International Cooperative Alliance - ICA)' च्या जागतिक मंडळावर 'सर्वसाधारण संचालक (At-Large Director)' म्हणून निवड झाली आहे.
ठळक मुद्दे:
- IFFCO ही भारतातील खत क्षेत्रातील प्रमुख सहकारी संस्था आहे.
- पनामा येथे झालेल्या ICA च्या सर्वसाधारण सभेत २४ उमेदवारांमधून निवडल्या गेलेल्या १५ 'ॲट-लार्ज डायरेक्टर्स'मध्ये संघानी यांचा समावेश होता.
ICA २०२६ सर्वसाधारण सभेबाबत महत्वाची माहिती:
- २०२६-२०३० या कार्यकाळासाठी ICA च्या सर्वसाधारण सभेमार्फत २४ उमेदवारांमधून १५ 'ॲट-लार्ज डायरेक्टर्स'ची निवड करण्यात आली आहे.
- सदर निवडणुकीत ६६ देशांमधील १९३ ICA सदस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ११६ मतदारांनी सहभाग घेतला होता.
- २०२६-२०३० या कालावधीसाठी ICA च्या अध्यक्षपदी अर्जेंटिनाचे डॉ. एरियल गुआर्को यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.