नुकताच आर्थिक वर्ष २०२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी (GDP) विकासदर ७% राहणार असल्याचा ICRA मार्फत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- भारतातील क्रेडिट रेटिंग एजन्सी असलेल्या 'ICRA लिमिटेड'ने आर्थिक वर्ष २०२७ च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी (Q1 FY27) हा विकासदर अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- सेवा क्षेत्रातील विस्तार मंदावल्यामुळे हा दर नीचांकी पातळीवर आला आहे.
- ICRA ने या तिमाहीमध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकासदर ७.७%, कृषी, वनीकरण आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकासदर ४% आणि सेवा क्षेत्राचा विकासदर ७.९% असा क्षेत्रनिहाय विकासदराचा अंदाज वर्तवला आहे.
ICRA बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): ICRA म्हणजेच ICRA Limited होय. हीच पूर्वी Investment Information and Credit Rating Agency of India Limited या नावाने ओळखली जायची.
- वैशिष्ट्य: ही एक क्रेडिट रेटिंग आणि संशोधन संस्था म्हणून प्रसिद्ध आहे.
- स्थापना वर्ष: १९९१ मध्ये ICRA ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा येथे ICRA चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या पालमादाई सुंदरराजन जयकुमार हे ICRA च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.