ICICI Life Insurance मार्फत नुकतीच ‘Har Kal Aasaan’ टॅगलाइनसह आपली नवीन ब्रँड ओळख सादर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • जीवन विमा अधिक सोपा, पारदर्शक, लवचिक तसेच भारतीय ग्राहकांसाठी सहज उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
  • जीवन विमा आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाला अधिक सुलभ करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब म्हणजे ही टॅगलाइन आहे.
  • हा उपक्रम भारतीय बाजारपेठेतील कंपनीच्या २५ वर्षांच्या प्रवासाचे प्रतीक आहे.
  • सदर उपक्रम हा ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा (Insurance for All by 2047)' या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

ICICI Life Insurance Limited बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • स्थापना वर्ष: ही सन २००० मध्ये स्थापित झालेली कंपनी आहे.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र येथे कंपनीचे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: सिद्धार्थ मिश्रा हे कंपनीच्या या पदावर नेतृत्व करत आहेत.