नुकतेच भारतीय तटरक्षक दलामार्फत (Indian Coast Guard - ICG) चेन्नई, तमिळनाडू येथे भारत-व्हिएतनाम संयुक्त सराव 'सहयोग हॉप टॅक' (Sahyog HOP TAC) चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय तटरक्षक दलाने (ICG) व्हिएतनाम तटरक्षक दलाच्या (VCG) सहकार्याने, दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चेन्नई, तमिळनाडू येथे भारत-व्हिएतनाम संयुक्त सराव 'सहयोग हॉप टॅक (Sahyog HOP TAC)' च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले आहे.
  • व्हिएतनाम तटरक्षक दल आणि ICG यांच्यातील कार्यात्मक कार्यक्षमता सागरी प्रदूषण निवारण आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी या क्षेत्रांतील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण व व्यावसायिक संवादाद्वारे वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.
  • भारत-व्हिएतनाम संयुक्त तटरक्षक सरावाची पहिली आवृत्ती २०१८ मध्ये तमिळनाडूच्या चेन्नई किनारपट्टीजवळील बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली होती.

ICG बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ICG म्हणजेच Indian Coast Guard अर्थात भारतीय तटरक्षक दल होय.
  • स्थापना वर्ष: १ फेब्रुवारी १९७७ (तटरक्षक दल कायदा, १९७८ अंतर्गत ऑगस्ट १९७८ मध्ये अधिकृतपणे स्थापन) रोजी ICG ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ICG चे मुख्यालय स्थित आहे.
  • बोधवाक्य:  वयम् रक्षामः (We Protect - आम्ही रक्षण करतो) हे ICG चे बोधवाक्य आहे.
  • वैशिष्ट्य: मुख्यत्वे सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध व बचाव कार्य करणारी ही संस्था आहे
  • अधिकारक्षेत्र: भारताच्या प्रादेशिक जलक्षेत्रावर याचे अधिकारक्षेत्र आहे.