ICC मार्फत नुकतीच २०२७ च्या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Women’s Champions Trophy) भारताला यजमानपद भूषविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- श्रीलंकेकडून प्रशासकीय समस्या आणि सुधारणांच्या अटींची पूर्तता न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२७ च्या पहिल्या महिला चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताला यजमान म्हणून मान्यता दिली आहे.
- १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत एकूण ६ सहभागी संघांसह ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
- मुंबई येथील 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया' (CCI) आणि वडोदरा (गुजरात) येथील 'वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम' या २ ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
ICC महिला चॅम्पियन ट्रॉफी २०२७ बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्पर्धात्मकता तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण संधी वाढवून जागतिक स्तरावर महिला क्रिकेटला बळकट करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे ६ संघ यात सहभागी होतील.
- 'राउंड-रॉबिन लीग' पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाईल ज्यामध्ये प्रत्येक संघ इतर सर्व संघांशी एकदा सामना खेळेल आणि अव्वल २ संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
ICC बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): ICC म्हणजेच 'International Cricket Council' अर्थात 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद' होय.
- स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी लंडन येथे ICC ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: २००५ पासून दुबई, संयुक्त अरब अमिराती (पूर्वी १९०९ ते २००५ दरम्यान लंडन) येथे ICC चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या ICC चे १११ सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या जय शाह हे ICC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.