ICAR द्वारे नुकतीच तूर पिकाच्या ‘आशा’ वाणाची भारतातील पहिली T2T जीनोम (जनुक संरचना) विकसित करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) तूर पिकाच्या ‘आशा’ या वाणाचा भारतातील पहिला सविस्तर माहितीसह युक्त असा 'टेलोमिअर-टू-टेलोमिअर' (T2T) संदर्भ जीनोम विकसित केला आहे.
- जागतिक संदर्भ जीनोम म्हणून हवामान-सहनशील, उच्च-उत्पन्न देणाऱ्या तसेच पोषक तत्वांनी समृद्ध अशा तूर वाणांच्या विकासाला गती देण्यासाठी याला मान्यता देण्यात आली आहे.
ICAR बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): ICAR म्हणजेच Indian Council of Agricultural Research अर्थात 'भारतीय कृषी संशोधन परिषद' होय.
- स्थापना वर्ष: १६ जुलै १९२९ रोजी ICAR ची स्थापना झाली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ICAR मुख्यालय स्थित आहे.
- अध्यक्ष: केंद्रीय कृषी मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सद्या डॉ. मांगी लाल जाट हे ICAR अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख ICAR संस्था:
- केंद्रीय कापूस संशोधन संस्था - नागपूर
- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (NRCG) - पुणे
- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (NRCP) - सोलापूर
- केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्था (CIFE) - मुंबई
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भू-उपयोग नियोजन विभाग - नागपूर