नुकताच भारतीय कृषी अनुसंधान परिषद–केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेमार्फत [Indian Council of Agricultural Research–Central Potato Research Institute (ICAR-CPRI)] पोषक घटकांनी समृद्ध असा जांभळा बटाटा ‘कुफरी जामुनिया’ विकसित करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- व्हिटॅमिन सी, अँथोसायनिन्स, कॅरोटीनॉइड्स, झिंक आणि लोह यांसारखे घटक यामध्ये समाविष्ट आहेत.
- हे वाण मुख्यतः पोषण सुरक्षा सुधारणे आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करणे या मुख्य उद्देशांसाठी विकसित करण्यात आले आहे.