मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) मनदीप के. भंडारी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education - CBSE) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत (Department of Personnel and Training - DoPT) सदर निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
- ते लोखंडे प्रशांत सीताराम यांची जागा घेतील.
- लोखंडे यांनी जून २०२६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष राहुल सिंग यांच्या बदलींनंतर CBSE अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता.
मनदीप के. भंडारी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- भंडारी हे अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरचे २००१ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.
- त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध पदे भूषवली आहेत.
- सार्वजनिक प्रशासन तसेच संस्थात्मक समन्वयाचा २ दशकांहून अधिक काळाचा त्यांना अनुभव आहे.
- त्यांनी सदर नियुक्तीपूर्वी जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांचे (Lt. Governor) प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.