नुकताच भारतीय वायुसेनेच्या IL-76MD ‘गजराज’ विमानाने लडाखमधील न्योमा येथे सर्वाधिक उंचीवर लँडिंग करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय वायुसेनेच्या रशियन बनावटीच्या ‘इल्युशिन IL-76MD गजराज (Ilyushin IL-76MD ‘Gajraj’)' या जड मालवाहू विमानाने आपल्या श्रेणीतील विमानांसाठी सर्वाधिक उंचीवर लँडिंग करण्याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
- सदर लँडिंग हे पूर्व लडाखमधील समुद्रसपाटीपासून १३,६२९ फूट (सुमारे ४,१५४ मीटर) उंचीवर स्थित असणाऱ्या मुध-न्योमा एअरबेसवर करण्यात आले आहे.
IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
- स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
- बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
- सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर मार्शल (Air Marshal) आशुतोष दीक्षित हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
- वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.