ड्रोन तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी पोखरणमध्ये नुकतीच 'IAF ड्रोनाथॉन (IAF Dronathon) २०२६' संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- जैसलमेरमधील पोखरण येथे १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत 'IAF ड्रोनाथॉन २०२६' आयोजित करण्यात आली होती.
- मानवरहित विमान प्रणाली, स्वायत्त कार्यप्रणाली, अनेक ड्रोनचा समूह म्हणून वापर (स्वार्म तंत्रज्ञान - swarm technologies), इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तसेच 'काउंटर-ड्रोन' प्रणालींवर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य सदर कार्यक्रम करतो.
- देशाचा संरक्षण उद्योग मानवरहित प्रणालींच्या प्रत्यक्ष चाचण्या घेण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर 'IAF ड्रोनाथॉन २०२६' ची सुरुवात हा एक चांगला संकेत आहे.
- या ३ दिवसीय कार्यक्रमाचे वायुसेना उपप्रमुख (Vice Chief of Air Staff) एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
- सदर कार्यक्रमात जवळपास २० हून अधिक संरक्षण कंपन्या, स्टार्टअप्स तसेच नवोन्मेषकांमार्फत प्रत्यक्ष कार्यक्षम वातावरणात आपली नाविन्यपूर्ण मानवरहित तंत्रज्ञाने सादर करण्यात आली.
'IAF ड्रोनाथॉन २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- भारतातील विकसित होत असलेल्या मानवरहित प्रणाली उद्योगाशी संवाद साधणे तसेच आव्हानात्मक कार्यक्षम वातावरणात या तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करणे या मुख्य उद्देशांसाठी सुरू करण्यात आलेला हा भारतीय वायुसेनेचा एक उपक्रम आहे.
- यामध्ये सहभागी संस्थांनी पोखरण रेंजवर मानवरहित विमान प्रणाली तसेच त्यासंबंधित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले.
IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
- स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
- बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
- सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर चीफ मार्शल (Air Chief Marshal) अमर प्रीतसिंग हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
- वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.