नुकतेच 'भारतीय हवाई दलामार्फत (Indian Air Force - IAF)' गुजरातच्या जामनगरमध्ये ‘सहायता सेतू (Sahayata Setu) २०२६’ या बहुराष्ट्रीय सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे:
- गुजरातच्या जामनगर येथील हवाई दल तळावर IAF मार्फत १७ ते १९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान हा बहुराष्ट्रीय वार्षिक सराव आयोजित करण्यात आला होता.
- IAF ने हा सराव ‘हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ च्या नेतृत्वाखाली ‘हेडक्वार्टर्स साऊथ वेस्टर्न एअर कमांड’ च्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध राष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने पार पाडला आहे.
- परस्पर कार्यक्षमता आणि समन्वित मानवतावादी मदत व आपत्ती निवारण कार्यांना बळकट करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
- या सरावामध्ये एकूण २४ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.