नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'हुरुन इंडिया परोपकारी व्यक्तींची यादी (Hurun India Philanthropy List) २०२६' च्या १३ व्या आवृत्तीमध्ये HCL Tech चे संस्थापक शिव नाडर २,५९३ कोटी रुपयांच्या देणगीसह सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत.
ठळक मुद्दे:
- 'एडेलगिव्ह फाउंडेशन (EdelGive Foundation)' आणि 'हुरुन इंडिया (Hurun India)' यांच्या भागीदारीतून 'हुरुन इंडिया फिलान्थ्रोपी लिस्ट'ची १३ वी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
- या यादीत शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने सलग ५ व्या वर्षी 'भारतातील सर्वाधिक उदार देणगीदार (Most Generous Donors)' होण्याचा मान कायम राखला आहे.
- सदर अहवालानुसार नाडर यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात २,५९३ कोटी रुपयांची देणगी दिली म्हणजेच याचा अर्थ त्यांनी दररोज सरासरी ७.१ कोटी रुपयांचे योगदान दिले असून यातील जवळपास निम्मी रक्कम कला, संस्कृती तसेच वारसा जतनासाठी खर्च करण्यात आली आहे.
प्रमुख दानशूर व्यक्ती - क्रमवारी आणि देणगी:
- १. शिव नाडर - २,५९३ कोटी रुपये
- २. गौतम अदानी आणि कुटुंब - ८७७ कोटी रुपये
- ३. बजाज कुटुंब - ६३२ कोटी रुपये
- ४. मुकेश अंबानी आणि कुटुंब - ६२० कोटी रुपये
- ५. नंदन निलेकणी - ३८० कोटी रुपये
- ६. कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब - ३६६ कोटी रुपये
- ७. सायरस एस. पूनावाला आणि अदर पूनावाला - ३३६ कोटी रुपये
- ८. सुधीर मेहता आणि समीर मेहता - ३३४ कोटी रुपये
- ९. रंजन पै आणि कुटुंब - २१९ कोटी रुपये
- १०. रोहिणी निलेकणी - २१५ कोटी रुपये