नुकतेच हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • चीनच्या हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्रातील हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • २९ मे १९३७ रोजी चीनमधील शांघाय येथे त्यांचा जन्म झाला होता.

तुंग ची-ह्वा यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • तुंग ची-ह्वा यांनी १९६९ मध्ये आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील होण्यापूर्वी अमेरिकेतील 'जनरल इलेक्ट्रिक (General Electric)' या कंपनीमध्ये काम केले होते.
  • मूलभूत कायदा तयार करण्यास मदत करणाऱ्या समितीमध्ये १९८५ मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
  • १९९७ पासून या माजी ब्रिटिश वसाहतीचा कारभार हाँगकाँगची ही 'लघु-राज्यघटना' चालवत आहे.
  • चिनी सरकारने १९९७ मध्ये ब्रिटिश राजवट संपल्यानंतर त्यांची हाँगकाँगचे पहिले नेते म्हणून निवड केली होती.
  • २००५ पर्यंत त्यांनी हे पद भूषवले.

आव्हानांचा सामना:

  • आशियाई आर्थिक संकट (१९९७)
  • बर्ड फ्लू प्रादुर्भाव
  • 'सार्स' (SARS - Severe Acute Respiratory Syndrome) महामारी (२००३)

प्रमुख भूमिका:

  • 'चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स'च्या (CPPCC) राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष म्हणून काम (कालावधी: १२ मार्च २००५ ते १० मार्च २०२३)