नुकताच हिमाचल प्रदेशातील देहरा येथे राज्यातील पहिला ओझोन-आधारित जलप्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते कांगडा जिल्ह्यातील देहरा येथे ओझोनचा वापर करणाऱ्या राज्याच्या पहिल्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- सरकारने या प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल.
- सदर प्रकल्प हा पाणी स्वच्छ करण्यासाठी ओझोन वायूचा वापर करण्यासोबत पाण्याची चवदेखील सुधारतो.
- पायाभूत सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या उपक्रमांपैकी हा एक मुख्य उपक्रम आहे.
- देहरा येथील या प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर तो इतर ठिकाणीही विस्तारित करण्यात येणार आहे.