नुकताच हेन्री बोरिस कागन आणि केन्सो सोआई यांना असममित सेंद्रिय संश्लेषणावरील कार्यासाठी (Work on Asymmetric Organic Synthesis) २०२६ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize in Chemistry) जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमार्फत फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री बोरिस कागन आणि जपानी रसायनशास्त्रज्ञ केन्सो सोआई यांना २०२६ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • त्यांच्या असममित सेंद्रिय संश्लेषणातील अरेखीय परिणाम (नॉनलाइनर इफेक्ट्स) आणि स्व-उत्प्रेरणा (ऑटोकेटॅलिसिस) यांचा शोध लावल्याबद्दल तसेच रेणूंच्या आरशातील प्रतिमांच्या निवडक उत्पादनाला चालना दिल्याबद्दल २०२६ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • या दोन्ही पुरस्कार विजेत्यांना १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनरचे (Swedish kronor - SEK) पारितोषिक जाहीर कारायत आले आहे.

पुरस्कार विजेत्यांबाबत महत्वपूर्ण माहिती:

हेन्री बोरिस कागन (फ्रान्स):

  • फ्रान्समधील बोलोग्ने-बिलानकोर्ट येथे १५ डिसेंबर १९३० रोजी त्यांचा जन्म झाला होता.
  • ते असममित उत्प्रेरणाचे (Asymmetric Catalysis) प्रणेते आहेत.

प्राप्त सन्मान/ पुरस्कार:

  • रसायनशास्त्रातील वुल्फ पारितोषिक (२००१)
  • रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार (२०२६)- १९८६ मधील नॉनलाइनर इफेक्ट्सच्या (Nonlinear Effects) पायाभूत शोधाबद्दल

केन्सो सोआई (जपान):

  • १९५० मध्ये जपानमधील हिरोशिमा येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • सोआई यांनी टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स येथे सेंद्रिय रसायनशास्त्राला पुढे नेनीत मोलाची कामगिरी बजावली आहे.
  • सध्या ते तिथे उपयोजित रसायनशास्त्र विभागात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.