नुकत्याच काहीर झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index) २०२६ नुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली ठरला असून भारत जागतिक स्तरावर ८४ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • गुंतवणूक स्थलांतरामध्ये (Investment migration) विशेष प्रावीण्य असलेल्या 'हेनली अँड पार्टनर्स (Henley & Partners)' या ब्रिटीश सल्लागार संस्थेने 'हेनली पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index २०२६' ची नवीन आवृत्ती जाहीर केली आहे.
  • सदर निर्देशांकांनुसार भारताने ऑक्टोबर २०२५ मधील ८५ व्या क्रमांकावरून एक स्थान वर सरकत ८४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
  • सिंगापूरने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.
  • सिंगापूरच्या पासपोर्टद्वारे १९३ देशांमध्ये पूर्व-व्हिसाशिवाय (visa-free) प्रवेश मिळवता येतो इतका तो सक्षम मानला जातो.
  • सिंगापूरनंतर जपान, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि दक्षिण कोरिया हे देश १८८ ठिकाणांवर प्रवेशासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

हेनली पासपोर्ट इंडेक्स २०२६ अव्वल क्रमवारी देश (देश आणि पूर्व व्हिसा शिवाय प्रवेश देश संख्या):

  • १. सिंगापूर - १९३
  • २. जपान, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि दक्षिण कोरिया - १८८
  • ३. स्वीडन - १८७
  • ४. बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नॉर्वे आणि स्पेन - १८६
  • ५. ऑस्ट्रिया, ग्रीस, माल्टा, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड - १८५
  • ६.  हंगेरी, मलेशिया, पोलंड आणि युनायटेड किंगडम (UK) - १८४
  • ७. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, झेक प्रजासत्ताक (Czechia), लाटविया, न्यूझीलंड, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया - १८३ 
  • ८. क्रोएशिया आणि एस्टोनिया - १८२ 
  • ९. लिक्टनस्टाईन आणि लिथुआनिया - १८१ 
  • १०. आइसलँड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) - १८०

सर्वात कमकुवत पासपोर्ट तळातील देश क्रमवारी:

  • १०६. अफगाणिस्तान
  • १०५. सीरिया
  • १०४. इराक
  • १०३. पाकिस्तान