हर्ष संघानी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ (International Cooperative Alliance - ICA) युवा समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय सहकार क्षेत्रातील हर्ष मुकेशभाई संघानी यांची २०२६-२०३० या कालावधीसाठी सदर फेरनिवड ही पनामा येथे आयोजित ICA युवा समितीच्या वार्षिक पूर्ण अधिवेशन आणि निवडणुकीदरम्यान संपन्न झाली.
- युवा समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
हर्ष संघानी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- वयाच्या २० व्या वर्षी २०२५ मध्ये जेव्हा संघानी यांनी पहिल्यांदा हे पद स्वीकारल्यानंतर ते ICA युवा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले जाणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले होते.
- 'फेस्टिव्हल ऑफ को-ऑपरेटिव्ह्ज २०२५' या मँचेस्टर, युनायटेड किंगडम येथे झालेल्या उत्सवानंतर २०२५ मध्ये त्यांची पहिल्यांदा ICA युवा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
- ॲना ॲग्युइरे यांच्याकडून त्यांनी हे पद स्वीकारले आहे.