सुप्रसिद्ध 'हॉल ऑफ फेम (Hall of Fame)' प्रशिक्षक आणि ५ वेळा एनबीए (NBA) चॅम्पियन ठरलेले डॉन नेल्सन यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फ्रिस्को येथे दिग्गज अमेरिकन बास्केटबॉल प्रशिक्षक आणि माजी खेळाडू डोनाल्ड आर्विड नेल्सन अर्थात डॉन नेल्सन यांचे निधन झाले.
- ते ८६ वर्षांचे होते.
- १५ मे १९४० रोजी अमेरिकेतील मिशिगन राज्यातील मस्कगॉन येथे त्यांचा जन्म झाला होता.
डोनाल्ड आर्विड नेल्सन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती:
- नेल्सन हे आपल्या वेगवान आणि आक्रमक रणनीतींसाठी ओळखले जात असत.
- आपल्या कारकिर्दीत त्यांनी एनबीए (NBA) मध्ये १४ हंगाम खेळले. या काळात त्यांनी ५ वेळा एनबीए चॅम्पियनशिप जिंकली.
- त्यांनी ३१ वर्षे एनबीए मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.
- त्यांनी १९८३, १९८५ आणि १९९२ या वर्षी अशा ३ वेळा 'एनबीए कोच ऑफ द इयर (NBA Coach of the Year)' हा पुरस्कार जिंकला होता.
- २०१२ मध्ये त्यांचा 'नेस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये (Naismith Memorial Basketball Hall of Fame)' समावेश करण्यात आला.