२०२८ च्या 'इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे (India Open Badminton Tournament)' आयोजन गुवाहाटी येथे होणार आहे.

ठळक मुद्दे:

  • २०२८ ची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीतील 'के.डी. जाधव इनडोअर हॉल' या पारंपरिक ठिकाणाऐवजी आसाममधील गुवाहाटी येथील 'नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (NCOE)' आयोजित केली जाणार आहे.
  • भारतीय बॅडमिंटन संघटनेचे (Badminton Association of India - BAI) सरचिटणीस श्री. संजय मिश्रा यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

२०२८ इंडिया ओपनबद्दल थोडक्यात माहिती:

  • 'इंडिया ओपन (India Open)' ही 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन' (Badminton World Federation - BWF) च्या 'सुपर ७५०' श्रेणीचा भाग असणाऱ्या 'वर्ल्ड टूर' कॅलेंडरमधील एक प्रमुख स्पर्धा आहे.
  • सदर स्पर्धेत जागतिक स्तरावरील अव्वल बॅडमिंटन खेळाडू सहभागी होतात.
  • नजीकच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात पहिल्यांदाच ही स्पर्धा नवी दिल्लीबाहेर आयोजित केली जाणार असून २०२९ मध्ये स्पर्धा पुन्हा नवी दिल्लीत आयोजित करण्यात येईल.
  • गुवाहाटीने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप तसेच आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धांसह अनेक प्रमुख बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन यापूर्वी केले आहे.

BWF बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): BWF म्हणजेच Badminton World Federation अर्थात बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन होय.
  • स्थापना वर्ष: १९३४ मध्ये 'इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन' (International Badminton Federation - IBF) म्हणून स्थापना झालेली होती. नंतर २००६ मध्ये तिचे 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन' असे नामकरण झाले.
  • मुख्यालयाचे ठिकाण: BWF ही संस्था मलेशियातील क्वालालंपूर येथे स्थित आहे.
  • सदस्य देश: २०२ राष्ट्रीय संघटना सध्या BWF च्या सदस्य आहेत.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या खुनयिंग पटामा लीस्वाडत्राकुल हे BWF च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.