गुजरातच्या पवित्र 'पिथोरा चित्रकले'ला भौगोलिक संकेत (Geographical Indication - GI) टॅग जाहीर झाला आहे.
ठळक मुद्दे:
- 'भौगोलिक संकेत नोंदणी' (Geographical Indications Registry - GIR) विभागामार्फत, गुजरातच्या प्राचीन भित्तिचित्र परंपरा असणाऱ्या 'पिथोरा चित्रकलेला' GI टॅग जाहीर करण्यात आला आहे.
- गुजरातच्या दोन कृषी उत्पादनांना म्हणजेच उंझा प्रदेशातील जिरे आणि बडीशेप यांना यापूर्वी जुलै २०२६ मध्ये GI टॅग प्रदान करण्यात आला होता.
पिथोरा चित्रकलेबद्दल थोडक्यात माहिती:
- पिथोरा चित्रकला ही गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यातील रथवा, भिल, भिलाला आणि नायका या समुदायांच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे.
- पारंपारिक पद्धतीनुसार, 'लखारा' म्हणजेच चित्रकार आदिवासी घरांच्या भिंतींवर आणि ओट्यांवर पिथोरा चित्रे काढतात.
- यासाठी कलेसाठी पाने, फुले, खनिजे आणि महुआ यांपासून मिळवलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.
- या चित्रांमधील मुख्य आकृत्या घोड्यांच्या असतात, जे देव-देवता आणि पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतात.
- त्यासोबतच यात प्राणी, पक्षी, जंगले, पाणी आणि निसर्ग यांचेही चित्रण असते जे या कलेचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते.
GI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): GI म्हणजेच 'Geographical Indication' अर्थात 'भौगोलिक संकेत' होय.
- GI संबंधित कायदा: भौगोलिक दर्शक (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ हा GI संबंधित कायदा आहे.
- कायदा लागू वर्ष: सदर कायदा २००३ साली लागू करण्यात आला होता.
- GI tag वैधता काळ: एकदा GI tag मिळाल्यानंतर तो १० वर्षे कालावधीसाठी वैध असतो.
- देशातील पहिले GI tag उत्पादन: २००४-०५ साली दार्जिलिंग चहाला देशातील पहिला GI tag प्रदान करण्यात आला होता.