नुकतेच गुजरातमार्फत व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी '२४x७ दुकाने विधेयक (24×7 Shops Bill)' मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • गुजरात सरकारने नुकतेच 'व्यवसाय सुलभता विधेयक (Ease of Doing Business Bill) २०२६' मंजूर केले आहे.
  • २४x७ व्यावसायिक कामकाज, स्वयं-घोषणा, जोखीम-आधारित अग्निसुरक्षा तसेच जलद सार्वजनिक सेवा यांसारख्या तरतुदी सदर विधेयकाद्वारे लागू करण्यात आल्या आहेत.
  • नियामक आव्हाने कमी करणे आणि व्यवसायांसाठीची प्रक्रिया सुलभ व कार्यक्षम करणे हा उद्योग राज्यमंत्री डॉ. जयराम गामित यांनी मांडलेल्या या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.