गुजरातमार्फत नुकतेच भारतातील पहिल्या 'क्रीडा जनुकशास्त्र कार्यक्रमाचे (Sports Genomics Programme)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • खेळाडूंची वैज्ञानिक पद्धतीने निवड आणि उच्च-स्तरीय प्रशिक्षणासाठी जनुकशास्त्र, क्रीडा विज्ञान, शरीरक्रियाशास्त्र आणि पोषण यांचा मेळ घालणारा भारताचा पहिला 'क्रीडा जनुकशास्त्र कार्यक्रम (Sports Genomics Programme)' कार्यक्रम गुजरातने सुरू केला आहे.
  • खेळाडूंची निवड आणि त्यांना उच्च कामगिरीच्या पातळीवर प्रशिक्षित करण्यासाठी अधिक वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केला जात आहे. 
  • या कार्यक्रमांतर्गत 'गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर'च्या देखरेखीखाली विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.
  • गुजरातचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अर्जुन मोडवाडिया यांच्या माहितीनुसार शास्त्रज्ञांनी खेळाडूंचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली असून पहिल्या वर्षात २,००० नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • ५ वर्षांत १०,००० खेळाडूंच्या नमुन्यांचे लक्ष्य आहे.