नुकताच गुजरातच्या अंबाजी मंदिरातील पारंपरिक प्रसाद असलेल्या ‘अंबाजी मोहनथाळ’ प्रसादाला 'भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication - GI)' टॅग मिळाला आहे.
ठळक मुद्दे:
- सदर टॅग हा भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे (Department for Promotion of Industry and Internal Trade - DPIIT)' संचालित ‘भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालय (Geographical Indications Registry - GIR)' प्रणालीद्वारे प्रदान केला जातो.
- ‘श्री आरासुरी अंबाजी माता देवस्थान ट्रस्टद्वारे' एप्रिल २०२४ मध्ये यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला होता.
GI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): GI म्हणजेच 'Geographical Indication' अर्थात 'भौगोलिक निर्देशांक' होय.
- GI संबंधित कायदा: भौगोलिक दर्शक (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ हा GI संबंधित कायदा आहे.
- कायदा लागू वर्ष: सदर कायदा २००३ साली लागू करण्यात आला होता.
- GI tag वैधता काळ: एकदा GI tag मिळाल्यानंतर तो १० वर्षे कालावधीसाठी वैध असतो.
- देशातील पहिले GI उत्पादन: २००४-०५ साली दार्जिलिंग चहाला देशातील पहिला GI tag प्रदान करण्यात आला होता.