नुकतीच ग्रीसमध्ये १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणणाऱ्या कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • ही बंदी १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे. 
  • 'किड्सवॉलेट (KidsWallet)' ॲपद्वारे यामध्ये मुलांच्या वयाची पडताळणी केली जाणार आहे.
  • मुलांची ऑनलाइन सुरक्षा, एकाग्रता आणि सर्वांगीण कल्याण यांसारख्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर सदर निर्णय घेण्यात आला आहे.
  • फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि लिंक्डइन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा या बंदीच्या कक्षेत समावेश होतो.