ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद नुकताच 'ग्रँड चेस टूर (Grand Chess Tour) २०२६' जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.
ठळक मुद्दे:
- 'ग्रँड चेस टूर (GCT) २०२६' ची अंतिम फेरी भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जिंकत हा किताब पटकाविण्याचा मान मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे..
- स्पर्धेची अंतिम फेरी २२ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अमेरिकेतील मिसूरी राज्यातील सेंट लुईस चेस क्लबमध्ये पार पडली.
- स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना याचा १५-१३ असा पराभव केला.
- या स्पर्धेत अमेरिकेच्या ग्रँडमास्टर वेस्ली सो याने तिसरे तर जर्मनीच्या ग्रँडमास्टर व्हिन्सेंट कीमरने चौथे स्थान पटकावले.
ग्रँड चेस टूर (GCT) २०२६ बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्पर्धेचा कालावधी: ही स्पर्धा ५ मे ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
- स्पर्धेचे स्वरूप: यामध्ये युरोप आणि अमेरिकेत आयोजित ५ नियमित-हंगामी स्पर्धांचा समावेश होता.
- स्पर्धेचा प्रकार: ही क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ अशा प्रकारांचा समावेश असलेली एक उच्च-स्तरीय स्पर्धा मालिका आहे.
- बक्षीस रक्कम: प्रज्ञानंदने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा किताब जिंकताना विजेतेपदाचे बक्षीस म्हणून त्याला २,००,००० अमेरिकन डॉलर्स मिळाले.