भारत सरकारमार्फत नुकतीच दिनेश पंत आणि गिरिजा सुब्रमण्यन यांची 'भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India - IRDAI)' च्या पूर्ण-वेळ सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • 'भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India - LIC)' चे माजी व्यवस्थापकीय संचालक दिनेश पंत आणि 'द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (The New India Assurance Company Limited - NIACL)' च्या माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गिरिजा सुब्रमण्यन यांची नुकतीच 'भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India - IRDAI)' च्या पूर्ण-वेळ सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) सदर नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली होती.

नियुक्तीबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • दिनेश पंत आणि गिरिजा सुब्रमण्यन या नियुक्त झालेल्या दोन्ही व्यक्तींना सार्वजनिक क्षेत्रात विमा संस्थांमध्ये धोरण निर्मिती, कामकाज तसेच प्रशासन या क्षेत्रांत कामाचा प्रदीर्घ स्वरूपाचा अनुभव आहे.

पंत यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • IRDAI च्या विमा-गणक तज्ज्ञ पदावर पूर्ण-वेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • IRDAI मध्ये येण्यापूर्वी ते LIC च्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director - MD) काम केले होते.

सुब्रमण्यन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • IRDAI च्या वितरण विभागात त्यांची पूर्ण-वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • त्यांनी यापूर्वी NIACL च्या CMD म्हणून काम केले होते.

IRDAI बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): IRDAI म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority of India अर्थात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण होय.
  • स्थापना वर्ष: IRDAI ही संस्था १९९९ मध्ये स्थापित झाली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे IRDAI स्थित आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या अजय सेठ हे IRDAI च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.