नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index)' २०२६ मध्ये १२२ देशांच्या यादीत भारत १०० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • जर्मनीस्थित मानवतावादी संस्था 'वेल्थहंगरहिल्फे'मार्फत (Welthungerhilfe) 'इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल लॉ ऑफ पीस अँड आर्म्ड कॉन्फ्लिक्ट' (IFHV) आणि 'हेल्व्हेटास' (Helvetas) यांच्या सहकार्याने 'जागतिक भूक निर्देशांक' २०२६ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
  • सदर अहवालाचे शीर्षक 'अन्न सुरक्षेशिवाय सुरक्षा नाही (No Security Without Food Security)' असे होते.
  • या निर्देशांकात १२२ देशांच्या यादीत भारत १०० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
  • यामुळे भारत 'गंभीर भूक (serious hunger)' असलेल्या देशांच्या श्रेणीत येतो.

सर्वोत्तम कामगिरी करणारे देश:

  • आर्मेनिया, बेलारूस, बल्गेरिया, चिली, कोस्टा रिका आणि क्रोएशिया हे ५.० पेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या २४ देशांमध्ये आहेत.
  • २५. मोल्डोव्हा (५.० स्कोअर)
  • २६. मंगोलिया (५.३ स्कोअर)
  • २७. अर्जेंटिना, ब्राझील आणि अझरबैजान हे देश संयुक्तपणे (५.५ स्कोअर)

सर्वात खराब कामगिरी करणारे ५ देश:

  • सोमालियाचा भूक निर्देशांक स्कोअर ४७.० इतका सर्वाधिक नोंदवला गेला आहे.
  • १२१. काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (३९.५ स्कोअर)
  • १२०. चाड (३८.० स्कोअर)
  • ११९. मादागास्कर (३६.५ स्कोअर) 
  • ११८. हैती (३४.४ स्कोअर)