नुकतीच मुंबई येथे ८ ते ११ सप्टेंबर २०२६ कालावधीदरम्यान 'ग्लोबल फिनटेक फेस्ट (Global Fintech Fest) २०२६' संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- मुंबई येथील जिओ वर्ल्ड सेंटर (Jio World Centre - JWC) येथे 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'ची यंदाची ७ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.
- ८ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही ४ दिवसीय फेस्ट पार पडली आहे.
- जगातील प्रमुख फिनटेक संमेलनांपैकी एक असलेल्या या फेस्टमध्ये विविध घटक एकत्र आले होते.
- उदयोन्मुख आर्थिक तंत्रज्ञान तसेच सर्वसमावेशक डिजिटल वित्त यांवर लक्ष केंद्रित करणे, जागतिक आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणणे या मुख्य उद्देशावर ही फेस्ट आधारित होती.
'ग्लोबल फिनटेक फेस्ट (Global Fintech Fest)' बाबत महत्वाची माहिती:
२०२६ सालची संकल्पना/थीम (Theme):
- 'प्रभाव पाडण्याची क्षमता: एजंटिक एआय | टोकनायझेशन | क्वांटम: सर्वसमावेशक वित्तपुरवठ्यासाठी विश्वसनीय, परस्पर-जोडलेल्या आणि जागतिक प्रणाली (Potential to Impact: Agentic AI | Tokenisation | Quantum: Trusted, Connected, Global Systems for Inclusive Finance)' ही यंदाच्या २०२६ सालच्या फेस्टची संकल्पना होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन:
- भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक:
- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India - NPCI)
- पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (Payments Council of India - PCI)
- फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल ( Fintech Convergence Council - FCC)