नुकतेच गोवा शिपयार्ड लिमिटेडमार्फत (Goa Shipyard Limited) गोव्यात चौथ्या स्वदेशी 'नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल वेसल' (NGOPV) - 'सृष्टी (Srishti)'चे जलावतरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी विकसित केलेल्या 'सृष्टी' (यार्ड १२८३) नावाच्या 'नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल वेसल' चे जलावतरण केले आहे.
- 'इंडियन नेव्हल शिप' (INS) 'सृष्टी' हे भारत सरकारच्या NGOPV कार्यक्रमांतर्गत विकसित केलेले चौथे जहाज आहे.
- सदर जलावतरण गोव्यातील वास्को-द-गामा येथील वाडेम स्थित त्यांच्या जहाजबांधणी केंद्रात पार पडले आहे.
- सदर जहाजाचे जलावतरण श्री. संदीप सहाय यांच्या हस्ते करण्यात आले.
- श्री. विश्वजित सहाय (सचिव, संरक्षण मंत्रालय) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- सागरी पाळत ठेवणे, बचाव कार्ये, सागरी मालमत्तेचे संरक्षण, मानवतावादी मदत तसेच आपत्ती निवारण या मुख्य उद्देशांसाठी हे जहाजे उपयुक्त ठरतात.