नुकत्याच जाहीर झालेल्या 'जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांकाच्या (Global Financial Centres Index - GFCI 40)' ४० व्या आवृत्ती आवृत्तीमध्ये GIFT सिटीने ३७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
ठळक मुद्दे:
- नुकतीच 'द झेड/येन पार्टनर्स (The Z/Yen Partners)' आणि 'चायना डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या (China Development Institute - CDI)' सहकार्याने 'जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांकाची ४० वी आवृत्ती - GFCI 40' जाहीर करण्यात आली आहे.
- सदर आवृत्तीमध्ये 'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी' (GIFT सिटी) ने जागतिक स्तरावर ३७ वा क्रमांक पटकावला आहे.
- जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांकाच्या ३९ व्या आवृत्तीमध्ये ती ४६ व्या स्थानावर विराजमान होती.
क्रमवारी:
- १. न्यूयॉर्क, अमेरिका
- २. लंडन, युनायटेड किंगडम
- ३. हाँगकाँग
- ४. सिंगापूर