कोविड-१९ महामारीच्या काळात दिलेल्या योगदानाबद्दल फ्रान्स सरकारकडून नुकताच डॉ. देवी शेट्टी यांचा ‘नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट (Knight of the National Order of Merit)' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • ‘नारायण हेल्थ’चे संस्थापक तसेच अध्यक्ष डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • फ्रान्स सरकारमार्फत ‘शेव्हलियर द लऑर्ड्रे नॅशनल द मेरित (Chevalier de l’Ordre national du Mérite - ‘नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’)' या पदवीने सन्मानित केले आहे. 
  • कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या फ्रेंच समुदायाला कोविड-१९ महामारीच्या काळात दिलेल्या मदतीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
  • बेंगळुरू येथे आयोजित एका समारंभात बेंगळुरूमधील फ्रान्सचे महावाणिज्य दूत मार्क लॅमी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.