नुकताच माजी टीव्ही निवेदक एडवर्ड रुकिदी किजानांगोमा यांचा युगांडातील 'टूरू (Tooro)' राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • सध्याचा चर्चेतील युगांडातील 'टूरू' राज्याच्या वारसाहक्काबाबतचा वाद संपुष्टात आणला गेला आहे.
  • माजी दूरचित्रवाणी वृत्त निवेदक एडवर्ड रुकिदी किजानांगोमा यांचा १३ वे राजे (ओमुकामा) म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आहे.
  • राजे ओयो न्यिंबा कबांबा इगुरु रुकिदी चौथे (IV) यांच्या निधनानंतर हा राज्याभिषेक सोहळा पार पडला आहे.

नियुक्तीबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • त्यांची निवड 'बाबिटो' कुळातील २१ सदस्यांच्या समितीद्वारे करण्यात आली आहे.
  • ते दिवंगत राजे ओयो न्यिंबा कबांबा इगुरु रुकिदी चौथे यांचे चुलत भाऊ आहेत. 
  • राणी बेस्ट केमिगिसा आणि राजकुमारी रुथ कोमुंटाले यांनी वारसाहक्कावरील दाव्यानंतरही ही निवड पारंपरिक वंश-आधारित पद्धतीनुसार करण्यात आली आहे.