नुकतेच भारतीय महिला हॉकी संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरदयाल सिंग भंगू यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • कॅनडातील सरे येथे त्यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • लायलपूर (सध्याचे फैसलाबाद, पाकिस्तान) येथे ३ ऑक्टोबर १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला होता.
  • २००० मध्ये त्यांना क्रीडा प्रशिक्षणासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च सन्मान 'द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.
  • सदर प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले हॉकी प्रशिक्षक ठरले होते.