१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress - INC) माजी खासदार सज्जन कुमार जे १९८४ च्या शीख-विरोधी दंगलीत दोषी ठरले होते - त्यांचे नवी दिल्ली येथे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे.
  • २३ सप्टेंबर १९४५ रोजी दिल्ली येथे सज्जन कुमार यांचा जन्म झाला होता.

सज्जन कुमार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती:

  • त्यांनी काँग्रेस पक्षात सामील होऊन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि नंतर १९७७ मध्ये ते दिल्ली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
  • कुमार संसदेचे कनिष्ठ सभागृह अर्थात लोकसभेचे ३ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
  • सर्वप्रथम १९८० मध्ये 'बाह्य दिल्ली (Outer Delhi)' मतदारसंघातून, आणि त्यानंतर १९९१ व २००४ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते.
  • शीख-विरोधी दंगलीदरम्यान ५ शीखांची हत्या आणि गुरुद्वारा जाळण्याच्या प्रकरणाशी संबंधित खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१८ मध्ये कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
  • फेब्रुवारी २०२५ मध्ये दंगलीदरम्यान २ शीख व्यक्तींच्या हत्येशी संबंधित आणखी एका प्रकरणात त्यांना दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले होते.