नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजामार्फत आपल्या ‘सब्र: फाइंडिंग माय वे इन क्रिकेट अँड लाइफ (Sabr: Finding My Way in Cricket and Life)' नावाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर पुस्तक हे 'पेंग्विन बुक्स ऑस्ट्रेलिया (Penguin Books Australia)' द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
  • या पुस्तकात त्याने आपल्या क्रिकेट प्रवासाचे, वैयक्तिक आव्हानांचे तसेच सांस्कृतिक ओळखीशी संबंधित अनुभवांचे वर्णन करतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या प्रगतीवर प्रकाश टाकला आहे.

उस्मान ख्वाजा बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झाला होता.
  • तो ऑस्ट्रेलियाचा पहिला मुस्लिम कसोटी क्रिकेटपटू ठरला होता.
  • जानेवारी २०११ मध्ये त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG), ऑस्ट्रेलिया येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
  • अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर २०२२ मध्ये त्याने यशस्वी पुनरागमन केले.
  • त्याने 'ICC मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर (ICC Men’s Test Cricketer of the Year) २०२३' हा किताब जिंकला होता.
  • जानेवारी २०२६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.