नुकतेच आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री 'अल्ला नानी' यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री अल्ला काली कृष्ण श्रीनिवास - जे 'अल्ला नानी' या नावाने लोकप्रिय होते - यांचे विशाखापट्टणम येथे निधन झाले आहे.
- ते ५६ वर्षांचे होते.
- आंध्र प्रदेशातील एलुरू येथे ३० डिसेंबर १९६९ रोजी त्यांचा जन्म झाला होता.
अल्ला नानी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- त्यांनी 'इंडियन नॅशनल काँग्रेसमधून (Indian National Congress - INC)' राजकारणात प्रवेश केला होता.
- आंध्र प्रदेशातील एलुरू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या.
- २०१९ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला होता.
- आमदार कोट्यातून विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची २०१७ मध्ये निवड झाली होती.
- जून २०१९ ते एप्रिल २०२२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणूनदेखील काम पाहिले होते.