फ्लाइंग वेज डिफेन्समार्फत नुकतेच भारताच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारित (Artificial Intelligence - AI) लढाऊ विमानाचे ‘एफडब्ल्यूडी सुप्रीम लाइट (FWD Supreme Lite)’चे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय संरक्षण स्टार्टअप - 'फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (Flying Wedge Defence & Aerospace Technologies Private Limited - FWDA), भारताच्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (AI) चालवल्या जाणाऱ्या लढाऊ विमान कार्यक्रमाचे, ‘एफडब्ल्यूडी सुप्रीम लाइट’चे अनावरण करण्यात आले आहे.
- डिजिटल इंजिनिअरिंग आणि संकल्पना विकासापासून प्रत्यक्ष विमानापर्यंतच्या प्रवासात याद्वारे एक मोठे स्थित्यंतर घडले आहे.
- संपूर्णपणे भारतात डिझाइन आणि विकसित केलेले हे विमान ३० तासांपर्यंत उड्डाणक्षमता आणि ३,००० किमी पल्ला गाठण्याची क्षमता देते.
- विकसित केलेले हे लढाऊ विमान 'मॉबिंग डॉक्ट्रिन (Mobbing Doctrine)' या नवीन युद्धतंत्रावर आधारित आहे जे संख्यात्मक, सामरिक आणि आर्थिक विषमता निर्माण करण्यासाठी मोठ्या संख्येने एआय-नियंत्रित लढाऊ विमानांच्या तैनातीचा प्रस्ताव देते.