नुकतीच कोलंबो, श्रीलंका येथे पहिली 'बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगाल उपसागर पुढाकार (बिमस्टेक - BIMSTEC)' आरोग्य मंत्र्यांची बैठक संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- सदर बैठक ही ११ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडली आहे.
- श्रीलंकेच्या आरोग्य मंत्रालयाचे मंत्री नलिंदा जयतिस्सा यांनी सदर बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे.
- या पहिल्या बैठकीत श्रीलंका, भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि थायलंड या बिम्स्टेक सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
- बैठकीत प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य सुरक्षा, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण तसेच आपत्कालीन सज्जता यांसारख्या विषयांवर यामध्ये चर्चा करण्यात आली.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश (जे.पी.) नड्डा यांनी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.