नुकताच फिलिपिनो स्ट्रक्चरल अभियंता अल्ड्रेई ओंग यांनी 'सेंटिनेल (Sentinel)' नावाचा एक कमी किमतीचा सेन्सर विकसित केल्याबद्दल २०२६ चा 'जेम्स डायसन ग्लोबल सस्टेनेबिलिटी पुरस्कार (James Dyson Global Sustainability Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर सेन्सर भूकंपानंतर काँक्रीटच्या बांधकामातील लपलेले नुकसान शोधण्याचे महत्वपूर्ण कार्य करतो.
  • 'सेंटिनेल' एका पारंपरिक काँक्रीट स्पेसर ब्लॉकला अशा सेन्सरमध्ये रूपांतरित करतो जो स्व-संवेदी काँक्रीटचा वापर करून विद्युत रोधातील बदलांद्वारे लपलेल्या भेगा शोधतो.
  • सदर उपकरण रोधातील बदल शोधण्यासाठी तसेच दूरस्थ देखरेखीसाठी ऑनलाइन डॅशबोर्डवर वायरलेस पद्धतीने डेटा पाठवण्यासाठी एम्बेडेड इलेक्ट्रोड्स आणि इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलचा वापर करते.
  • ओंग याना बक्षीस रक्कम म्हणून २.३९ दशलक्ष PHP (फिलिपिनो पेसो) मिळाले आहेत.