'भारतीय फुटबॉल खेळाडू संघटनेमार्फत (Football Players’ Association of India  - FPAI)' नुकतेच 'भारतीय फुटबॉल पुरस्कार (Indian Football Awards) २०२६' साठी मोहन बागानचा स्टार खेळाडू लालियानझुआला छांगटे याला 'इंडियन फुटबॉलर ऑफ द इयर (Indian Footballer of the Year)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • मिझोरामचा भारतीय मिडफील्डर लालियानझुआला छांगटे याला 'इंडियन फुटबॉलर ऑफ द इयर २०२६' म्हणून घोषित करण्यात आले.
  • पंजाबच्या मनीषा कल्याणला 'इंडियन वुमेन्स प्लेयर ऑफ द इयर (Indian Women’s Player of the Year award)' हा पुरस्कार मिळाला.
  • भारतीय फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू बायचुंग भुतिया यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 'भारतीय फुटबॉल खेळाडू संघटनेमार्फत (Football Players’ Association of India  - FPAI)' आयोजित 'भारतीय फुटबॉल पुरस्कार (Indian Football Awards) २०२६' सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

भारतीय फुटबॉल पुरस्कार २०२६ बद्दल थोडक्यात माहिती:

  • 'ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला (East Bengal Football Club)' मागील २०२५-२६ च्या हंगामात 'इंडियन सुपर लीगचे (Indian Super League - ISL)' विजेतेपद पटकावल्याबद्दल ISL चॅम्पियन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 'ईस्ट FC वुमेन्स' संघाचा २०२५-२६ चे 'इंडियन वुमेन्स लीग' (Indian Women’s League - IWL) विजेतेपद पटकावल्याबद्दल ही गौरव करण्यात आला.

इतर प्रमुख विजेते:

  • सनन मोहम्मद के. (जमशेदपूर FC) - 'यंग प्लेयर ऑफ द इयर (Young Player of the Year award)' पुरस्कार
  • संफिदा नोंग्रम (गढवाल FC) - 'वुमेन्स यंग प्लेयर ऑफ द इयर (Women’s Young Player of the Year)' पुरस्कार
  • सावियो मेडेइरा - 'कोच एज्युकेशन अवॉर्ड (Coach Education Award)' पुरस्कार
  • 'रॅपिड स्पोर्ट्स' आणि 'द राइट वे' (The Right Weigh) - 'प्लेअर परफॉर्मन्स अँड डेव्हलपमेंट अवॉर्ड' पुरस्कार