नुकतीच 'फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (Fédération Internationale de Football Association - FIFA)' अर्थात फिफामार्फत २०३१ महिला विश्वचषकासाठी अमेरिका, मेक्सिको, कोस्टा रिका आणि जमैका यांची संयुक्त यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आयोजित करण्यात आलेल्या 'एक्स्ट्राऑर्डिनरी फिफा काँग्रेस (Extraordinary FIFA Congress)' दरम्यान FIFA ने २०३१ फिफा महिला विश्वचषकासाठी अमेरिका, मेक्सिको, कोस्टा रिका आणि जमैका यांची यजमान म्हणून निवड केली आहे.
  • यासोबतच २०३५ च्या स्पर्धेसाठी युनायटेड किंगडम (UK) ची यजमान म्हणून अधिकृत घोषणा केली आहे.

यजमान निवड - स्पर्धा विस्तारबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • २०३१ फिफा महिला विश्वचषक ही पहिलीच आवृत्ती असेल ज्यामध्ये ३२ ऐवजी ४८ संघ सहभागी होतील.
  • यासोबतच ४ देशांमध्ये आयोजित होणारा हा पहिलाच वरिष्ठ महिला विश्वचषक ठरणार आहे.
  • २०३१ च्या या ११ व्या आवृत्तीसाठी २० शहरांची यजमान शहरे म्हणून निवड प्रस्तावित आहे.