FICCI आणि CNFI यांच्यामार्फत बेंगळुरू, कर्नाटक येथे १० व्या तैवान-भारत औद्योगिक सहकार्य शिखर परिषदेचे संयुक्त आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे:

  • बेंगळुरू, कर्नाटक येथे 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (The Federation of Indian Chambers of Commerce and Industry. - FICCI) ने 'चायनीज नॅशनल फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजच्या' (Chinese National Federation of Industries- CNFI) भागीदारीत तैवान-भारत औद्योगिक सहकार्य शिखर परिषदेच्या १० व्या आवृत्तीचे आयोजन केले.
  • वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या 'उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे' (Department for Promotion of Industry and Internal Trade - DPIIT) सचिव अमरदीप सिंग भाटिया आणि तैवानच्या आर्थिक व्यवहार उपमंत्री सिंथिया कियांग यांच्या नेतृत्वाखाली सदर शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
  • उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुमारे २०० हून अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या या एकदिवसीय परिषदेतून ६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • सुरक्षा पाळत ठेवणे, नेटवर्किंग आणि संसाधन पुनर्वापर या क्षेत्रांचा यामध्ये समावेश होता.
  • भारत आणि तैवान यांच्यात सार्वजनिक वित्त सहकार्याबाबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.