भारतीय वायुसेना जोधपूरमध्ये 'तरंग शक्ती सराव (Exercise Tarang Shakti) २०२६' हा बहुराष्ट्रीय हवाई सराव आयोजित करणार आहे.

ठळक मुद्दे:

  • राजस्थानमधील जोधपूर येथे २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय वायुसेना या बहुराष्ट्रीय हवाई सरावाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे.
  • सदर सरावाद्वारे विविध देशांच्या संयुक्त हवाई मोहिमा तसेच परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या सरावासाठी एकत्र येणार आहेत.

'तरंग शक्ती सराव २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • 'X' अर्थात पूर्वीच्या ट्विटरवरील एका पोस्टद्वारे भारतीय वायुसेनेने या सरावाच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे.
  • आगामी सराव ही 'तरंग शक्ती'ची २०२४ मधील पहिल्या आवृत्तीनंतर दुसरी आवृत्ती असेल.