नुकतीच 'इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमार्फत (Equitas Small Finance Bank)' बालाजी नुथलापाडी यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (Interim Chief Executive Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेतर्फे त्यांचे पूर्णवेळ संचालक आणि कार्यकारी संचालक बालाजी नुथलापाडी यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
  • सदर नियुक्ती बँकेच्या 'नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी'च्या शिफारशीनुसार तसेच संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर करण्यात आली असून ती RBI मान्यतेच्या अधीन आहे.
  • ते पी. एन. वासुदेवन यांची जागा घेतील.

बालाजी नुथलापाडी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • १९९७ मध्ये चेन्नई, तामिळनाडू (TN) येथे सिटीबँक (Citibank) मधून त्यांनी आपल्या बँकिंग कारकीर्दीची सुरुवात केली होती.
  • बँकिंग ऑपरेशन्स, तंत्रज्ञान तसेच वित्तीय सेवा क्षेत्रांत त्यांना २८ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

भूषविलेली पदे/ भूमिका:

  • व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख - 'सिटी सोल्युशन्स सेंटर्स (Citi Solutions Centers)'
  • प्रमुख - 'इंडिया ऑपरेशन्स अँड टेक्नॉलॉजी (India Operations and Technology)'