नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक (Environmental Performance Index - EPI) २०२६ मध्ये भारत १७६ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • नुकतीच येल विद्यापीठामार्फत 'पर्यावरण कामगिरी निर्देशांक' २०२६ ची नूतन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एस्टोनिया अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
  • सदर आवृत्तीमध्ये १७७ देशांच्या यादीत भारत २२.४६ च्या एकूण गुणांसह १७६ व्या स्थानावर असून तो या यादीत खालून दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
  • एस्टोनियाने ७४.७९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले; त्यानंतर ७४.२४ गुणांसह लक्झेंबर्ग दुसऱ्या आणि ७१.५१ गुणांसह युनायटेड किंगडम (UK) तिसऱ्या स्थानावर राहिले.

EPI २०२६ बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती:

  • या निर्देशकानुसार अव्वल ५ देशांमध्ये युरोपमधील देशांचा समावेश आहे.
  • सर्वात अव्वल ५ देश: एस्टोनिया, लक्झेंबर्ग, यूके, फिनलंड (चौथा) आणि नेदरलँड्स (पाचवा) यांचा यात समावेश आहे.
  • सर्वात तळाचे ५ देश: लाओस (२१.७८ गुण) हा या यादीत सर्वात तळाच्या स्थानावर आहे. त्यानंतर भारत; बांगलादेश (१७५ वे स्थान), माली (१७४ वे स्थान) आणि व्हिएतनाम (१७३ वे स्थान) यांचा क्रमांक लागतो.