इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने नुकतीच ११ वर्षांच्या कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे:

  • वयाच्या ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याने आपली ११ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आणली आहे.
  • ११ जानेवारी १९९० रोजी इंग्लंडमधील नॉर्थम्बरलँड येथील ॲशिंग्टन येथे त्याचा जन्म झाला होता.
  • ३८ सामन्यांत ५४ बळी घेत तो पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
  • आपल्या एकूण कारकीर्दीत त्याने ३८ कसोटी सामन्यांत ११९ बळी आणि ७० एकदिवसीय सामन्यांत ८० बळी घेतले आहेत.

मार्क वुड यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • वुडने २०१५ मध्ये कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
  • २०१९ चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग बनताना त्याने त्यामध्ये १८ बळी घेत मोलाची कामगिरी बजावली होती.
  • २०२२ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य बनताना त्यात त्याने ९ बळी घेतले होते.
  • तो २०१५ मध्ये ॲशेस मालिका जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा सदस्य होता.